नव्या पिढीने आधुनिक शेतीकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, 05 – नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. खान्देशची समृद्ध कृषी परंपरा, लोकसंस्कृती आणि पशुधनाचा वारसा जपणाऱ्या ‘खान्देश कृषी संस्कृती
कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नाशिक, 05: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ही संधी समजून जबाबदारीने काम करावे. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार तसेच विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. नाशिक–त्र्यंबकेश्वर
सिंहस्थ कुंभमेळ्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत
नाशिक, 05 : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे, असे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज दिले. केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस
सांगली, 05: सांगली येथे १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या हिट अँड रन घटनेतील जखमींची उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली व धीर दिला. यावेळी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांच्या डोक्यावर मायेचा हात…
सातारा/फलटण, 05: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत दिवंगत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन
मुख्य सचिवांनी घेतला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा आढावा
पुणे, 05 : मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी कार्यालयाच्या प्रशासकीय, तांत्रिक तसेच नागरिक सेवाविषयक विविध बाबींची माहिती त्यांनी घेतली. या आढावा बैठकीदरम्यान नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, दस्तऐवज नोंदणीची
कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, 05 : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (बीबीएटीआरसी) चे कौतुक करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी आवर्जून नमूद केले
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, 05 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतिवीर राजे उमाजी नाईक या पुरस्कारांसाठी सन २०२५-२६ वर्षाकरिता इच्छुक व्यक्ती व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी व्यक्ती
हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
मुंबई, 05: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० योजना योजना विभागाने प्रभावीपणे राबवण्याचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश कृषी, वित्त व
मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
मुंबई, 05 : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे
