ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार
ठाणे

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार

जानेवारी 2, 2026

ठाणे 02) : येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 प्रभाग समिती मधील 11 ‍निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 1107 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल झाले होते.

31 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत एकूण 99 नामनिर्देशन अर्ज बाद ठरले. उमेदवारांना 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, आज दि. 1 जानेवारी 2026 रोजी एकूण 27 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, त्यानंतर एकूण 891 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

उद्या दि. 2 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून, त्यानंतर अंतिमरित्या ‘निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची’ यादी जाहीर होणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.

बातमी शेअर करा