Success Story : 27 व्या वर्षी अभिनयाला रामराम; व्यवसायाकडे दिले लक्ष, आज 8000 कोटींच्या साम्राज्याचा मालक
उद्योग

Success Story : 27 व्या वर्षी अभिनयाला रामराम; व्यवसायाकडे दिले लक्ष, आज 8000 कोटींच्या साम्राज्याचा मालक

फेब्रुवारी 12, 2026

Business Success Story – एका चित्रपटाने अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली. मात्र त्याने अभिनयाला रामराम करत व्यवसायाकडे लक्ष दिले. आज तो अभिनेता 8000 कोटीचं साम्राज्याचा प्रमुख आहे.

2013 साली ‘रमैया वस्ताय्या’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशानंतर तो रातोरात प्रसिद्ध झाला आणि अनेकांसाठी ते क्रश बनला. मात्र, अवघ्या 27 व्या वर्षी त्यांने अभिनयाला रामराम ठोकत कौटुंबिक व्यवसायात, विशेषतः टिप्स इंडस्ट्रीजमध्ये, सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली. हा निर्णय त्याने विचारपूर्वक घेतला होता, कारण त्याला अभिनयाच्या पलीकडे जाऊन मनोरंजन उद्योगाला चालवणारी यंत्रणा समजून घ्यायची होती. ही यशोगाथा आहे गिरीश कुमार यांची जाणून घेऊया त्याबद्दल

गिरीश कुमार यांचा जन्म 30 जानेवारी 1989 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील कुमार एस. तौरानी हे टिप्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत, त्यामुळे घरात लहानपणापासूनच संगीत आणि चित्रपटांशी संबंधित चर्चा होत असे. गिरीश यांना अभिनयाची आवड होती, परंतु त्यांनी थेट मोठ्या भूमिकेतून सुरुवात करण्याऐवजी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले, नृत्य वर्ग आणि फिटनेसवरही लक्ष केंद्रित केले. प्रभुदेवा यांनी त्यांना ‘रमैया वस्ताय्या’साठी निवडले, ही त्यांच्यासाठी एक मोठी संधी होती. गिरीश यांना प्रसिद्धी मिळाली. गिरीश यांना ‘बेस्ट डेब्यू ऍक्टर’साठी अनेक नामांकनं मिळाली. यानंतर 2016 मध्ये त्यांचा ‘लवशुदा’ हा चित्रपट आला, जो पहिल्या चित्रपटासारखा यशस्वी नसला तरी गिरीश यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.

 

बातमी शेअर करा

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत